भाजपाचे जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी धोक्यात, जातीचा दाखला रद्द

Jayasidheshwara Shivachari

सोलापूर : सोलापूरचे भाजपाचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महाराज अडचणीत आले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, वंचित बहूजन आघाडीचे डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांना पराभूत करुन विजयी झालेले जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं म्हणत जात पडताळणी समितीने रद्द केला, असा दावा तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी केला. थोड्याच वेळात प्रमोद गायकवाड यांच्या हातात निकालाची प्रत मिळणार आहे. त्यांना अधिकाऱ्यांनी फोनवरुन जातीचा दाखला रद्द केल्याची माहिती दिली. त्यामुळे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता धोक्यात आली आहे.

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी १५ फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले १२ अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य दोघांनी केली होती. त्यानुसार डॉ. महास्वामी यांनी दिलेल्या पुराव्यांची शहानिशा दक्षता पथकाद्वारे करण्यात आली. त्यावर अंतिम सुनावणी पार पडली असून समितीतर्फे आज दोन्ही बाजूच्या पक्षकारांच्या हाती निकाल सोपविला जाणार आहे. अशी माहिती जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सुळ यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे, सोलापुरातील जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्द खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. मूळ कागदपत्रे जोडली आहेत, त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर सादर करता आली नसल्याचं सांगत, दक्षता पथकाने नोंदवलेल्या अहवालावर आक्षेप घेत नवे पथक नियुक्त होऊन पुराव्याची पुनर पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश