ठाकरे सरकारविरोधात भाजपची मानवाधिकार आयोगाकडे धाव

Uddhav Thackeray & Human Rights Commison

मुंबई :- सुशांत सिंह आत्महत्याप्रकरण, त्यानंतर कंगनाचा ट्विटरहल्ला, माजी नौदल अधिका-याला केलेली मारहाण या प्रकरणांवरून ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरत आहे. त्यातच मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना दिलासा दिला असला तरी भाजपने या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, भाजपने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून भाजप शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एच. एल.  दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजप खासदारांनी राज्यातील आठ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

राज्यसभेचे सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी आयोगाला सांगितले की, डिसेंबर २०१९ पासून राज्यात मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लिहिणाऱ्यांवर अत्याचार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात आतापर्यंत कुठे कुठे मानवाधिकार आयोग कायद्याची पायमल्ली झाली यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मग ती पालघर साधू हत्याकांड असो वा २३ डिसेंबर २०१९ रोजी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हिरामण तिवारी नावाच्या व्यक्तीने भाष्य केले, तर सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीवर हल्ला करून जबरदस्तीने त्याचे मुंडण करण्यात आलेले प्रकरण. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं भाजपच्या शिष्टमंडळानं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सर्व मानवी प्रकरणांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER