भाजपची नवी खेळी ! शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर?

fadnavis-uddhav thackeray.jpg

मुंबई : भाजप – शिवसेनेत सत्तेच्या वाटपावरून काही करार झाल्यानंतरच लोकसभा विधानसभा निवडणुकीत युती करण्यात आली होती हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगत राहीले. किंबहुना शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनीही अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हे असेच ठरले असल्याची दवंडी पिटवत राहीले. मात्र, भाजपने असे काही ठरलेच नव्हते असे म्हणून सेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी धुडकावून लावली होती. आता अनेक चर्चा बैठकानंतर आघाडीसोबत शिवसेना सरकार स्थापन करायला जात आहे. अशातच भाजपने शिवसेनेला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची ऑफर दिल्याचे कळत आहे. हे वृत्त ‘लोकसत्ता’ दैनिकाने दिलं आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेना पेचात अडकण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठारला आहे. मंत्रीपदं, खाती याचादेखील तपशील तयार झाला आहे. मात्र, आतापर्यंत हा तीनही पक्ष एकत्र येणं शक्य नाही अशा मानसिकतेत राहीलेल्या भाजपला आता अचानक सेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची उपरती सुचली आहे.

पवार-ठाकरे भेटीत खातेवाटपावर नवा फार्मुला; असे असणार ‘महाविकास आघाडी’च मंत्रिमंडळ?

भाजपच्या दिल्लीतील एका मोठ्या नेत्याने ही ऑफर दिल्याचा दावा ‘लोकसत्ता’ने केला आहे. परंतु असा कोणताही प्रस्तावा आला नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधीपक्षात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘प्रेशर टॅक्टिक्ट्स’ अर्थात दबावतंत्र म्हणून भाजपने सेनेला ऑफर दिल्याची चर्चा आहे. आता भाजपला शिवसेनेकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.

भाजपच्या प्रस्तावामुळे शिवसेनेचीच कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपसोबत युती तोडल्यानंतर परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा जुळवून घेताना कुरबुरी होणंही साहजिक आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची बोलणी बरीच पुढे गेल्यामुळे मागे फिरणं सेनेसाठी विश्वासघातकी ठरणारं आहे.