जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ममता बॅनर्जींचे आचरण अत्यंत अशोभनीय; भाजपचा पलटवार

bjp Ravishankar Prasad slams Mamata Banerjee

नवी दिल्ली : कोरोना (Corona Crises) संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र या बैठकीला पश्चिम बंगालचा एकही जिल्हाधिकारी हजर नव्हता. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर ‘केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही’, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. ममतांच्या या आरोपाला आता केंद्र सरकारनं प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जींनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांगल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र आजच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आचरण अत्यंत अशोभनीय होतं. त्यांनी संपूर्ण बैठकीला एक प्रकारे गालबोट लावण्याचे प्रयत्न केले. त्यांनी आरोप केला की, फक्त भाजपशासित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावलं जातं. पण, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनीही आपलं मत मांडलं. ममता बॅनर्जी यांनी २४ परगनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही. त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकाऱ्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे, अशा शब्दात रविशंकर प्रसाद यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप फेटाळून लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button