शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणे ही शरद पवारांची राजकीय हतबलता – राम कदम

Ram Kadam slams Shiv Sena and sharad Pawar

मुंबई :- जो पक्ष बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळू शकला नाही त्याला वचन पळणारा मित्र म्हणणे ही शरद पवारांची राजकीय हतबलता आहे, असा टोमणा भाजपाचे (BJP) आमदार व प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी मारला.

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसेनेची (Shivsena) तारीफ करताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते की, शिवसेना हा शब्द पाळणारा पक्ष आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील.

यावर टीका करताना राम कदम म्हणालेत की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींंचे (Narendra Modi) केलेले कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे पवारांना म्हणावे लागले ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकिय हतबलता आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही असे संजय राऊत यांनी नुकतेच म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेसोबत युती केलीत त्याचे काय? भाजप नेत्याचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button