एकनाथ खडसे आणि फडणवीसांमध्येही बोलणं झालं; रक्षा खडसेंच्या विधानाने चर्चेला विधान

Maharashtra Today

मुंबई :- राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . भाजपाला सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यादरम्यान त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या भेटीवरुन वेगळे तर्क -वितर्क काढण्यात येत आहे. या घडामोडीवर खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना भाष्य केले आहे.

फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे, असे रक्षा खडसे म्हणाल्या.

आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,असे यावेळी त्यांनी सांगितले.

रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरही भाष्य केले. अशा चर्चा खूप होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील निवडणूकही भाजपाकडूनच लढणार असल्याचे त्या म्हणल्या.

ही बातमी पण वाचा : …तर ते पवारांना ओळखतच नाहीत ; फडणवीस-पवार भेटीवर शिवसेनेचे अग्रलेखातून भाष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button