केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकारला एवढंच येतं; विखे-पाटलांची टीका

Vikhe patil - Uddhav Thackeray - Maharastra Today
Vikhe patil - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा तुटवडा यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) निशाणा साधला आहे. मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिले . केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे.

केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button