पनवेलमध्ये भाजपला पुन्हा धक्का; गणेश पाटील यांचा पक्षाला रामराम

BJP Flags

नवी मुंबई :- पनवेल येथे भाजपमध्ये गळती सुरूच आहे. भाजपला पुन्हा मोठा धक्का बसला असून पनवेल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश पाटील (Ganesh Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकला. यावेळी पाटील यांनी पक्ष सोडताना भाजप (BJP) पक्षाचे सर्वेसर्वा रामशेठ ठाकूर आणि स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली.

पनवेल नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असताना स्थानिक नेत्यांमध्ये वादविवाद होताना दिसत आहे. त्यामुळे गणेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी गणेश पाटील यांचे  जोरदार स्वागत करण्यात आले.

पेण विधानसभा आमदार धैर्यशील पाटील आणि जे. एम. म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले. यावेळी पनवेल पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, चिटणीस नारायण घरत, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : ‘फडणवीस पुन्हा येतीलच तुम्हीही या’, भाजप नेत्याची अजितदादांना थेट ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER