अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपाची निदर्शने

कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी झालेली दुर्देवी आत्महत्या यास कारणीभूत ठरवत आज पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami)यांना कोणतीही नोटीस न देता अतिशय निंदनीय पद्धतीने पोलिसांनी अटक केली. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर तर्फे बिंदू चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे (Rahul Chikode) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

भाजपा जिल्हाध्यक्ष चिकोडे म्हणाले, लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गात प्रत्यक्षात मात्र माध्यमांच्या गळचेपीचे काम सुरु आहे. लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य असताना हे सरकार ऊठसूट त्याच्या विरोधात बोलले आणि सत्य बाजू दाखवली की वैयक्तिक सूड भावनेपोटी त्या व्यक्तीला कोणतेही कारण न देता अटक करणे, तुरुंगात डामणे अशा घटना वारंवार घडत आहेत.

जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, महापालिका भाजपा गटनेते अजित ठाणेकर, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिवटे,सचिन तोडकर, अमोल पालोजी, राजू मोरे, विजय आगरवाल, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, दिग्विजय कालेकर, नगरसेवक विजय खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष भरत काळे, डॉ. राजवर्धन, कोळवनकर, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा :अर्णबनंतर पोलिसांचा आणखी दणका, फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्याअटकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER