जबाबदारी झटकायची आणि श्रेयही घ्यायचे ! उद्धव ठाकरेंचे दुटप्पी धोरण; दरकरांचा टोमणा

Praveen Darekar-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय(Lockdown Extend) घेतला आहे. काल जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला . यावरून भाजपने(BJP) त्यांच्यावर टीकास्त्र सोडले .

एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशा शब्दात भाजप नेते प्रविण दरेकर(Praveen Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले .

राज्यातील लसीकरणाची स्थिती काय, त्यावर ते काही बोलले नाही. तसेच त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावरही पण बोलण टाळले. एका ठिकाणी कोविड रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटवत आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन वाढवत आहात. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे बोलून जबाबदारी झटकायची. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीकाही दरेकरांनी केली .

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं. मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाही. लसीकरणाच्या संदर्भात टाईम बाऊंड असे काहीही भाष्य केले नाही. कोरोनामुक्त गाव, जिल्हा आणि राज्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. जर जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button