महिलांसाठी लोकल सुरू करण्यात भाजपा करते आहे राजकारण; काँग्रेस-शिवसेनेचा आरोप

Shivsena & BJP

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, अशी वेळेवर महिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देता येणार नाही. यासाठी तयारी आवश्यक आहे, असे सांगत रेल्वे बोर्डाने पश्चिम व मध्य रेल्वेने लोकल सेवा महिलांसाठी सुरू होणार नाही, असे कळवले.

दरम्यान, लोकल सेवा सुरू होणार म्हणून शनिवारी सकाळपासून महिला रेल्वे स्थानकावर आल्या. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. विरार रेल्वे स्थानकात महिलांची मोठी गर्दी झाली होती. अनेक महिला ताटकळत उभ्या होत्या. रेल्वे आणि राज्य सरकारच्या भांडणात महिलांची काय चूक? अशी एका महिलेने दिली.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांना राज्य सरकारने ट्रेनचा प्रवास करण्याची मुभा देऊन एक प्रकारे गिफ्ट दिले होते, पण रेल्वे प्रशासनाने महिलांना प्रवास नाकारत राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस-शिवसेनेने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER