मुंबई मनपा : भाजपाची अविश्वास ठराव आणण्याची तयारी

BJP - BMC

मुंबई : बृहनमुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टी (BJP) सत्तारूढ शिवसेनेविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा विचार करते आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे. मनपामधील भाजपाचे नेते विनोद मिश्रा (Vinod Mishra) म्हणाले की, सत्तारूढ पक्षाला पराभूत करण्याइतके संख्याबळ आमच्याकडे नाही हे आम्हाला माहीत आहे.

अविश्वास ठरावातून आम्हाला मनपात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष वेधण्यासाठी चर्चा करायची आहे. महापौरांच्या मुलाला मनपाकडून कोरोना (Corona) केंद्राच्या व्यवस्थापनाचे मिळालेले कंत्राट हा मनपात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा धडधडीत पुरावा आहे.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (शिवसेना) (Shiv Sena) म्हणाले की – भाजपाकडे काहीही मुद्दे नाहीत. कोरोनाच्या साथीच्या काळात मनपा चांगले काम करते आहे. या कामात मदत करण्याऐवजी भाजपा अडथळे निर्माण करते आहे. भाजपाचे आरोप निराधार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER