स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त भाजपाकडून व्याख्यानाच आयोजन

Savarkar

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त उद्या भाजपाकडून अध्यात्मवादी सावरकर या विषयावर व्याख्यान व गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी’, शेतकऱ्यांची ६० हजार पत्रं राज्यपालांकडे सुपूर्द

सायंकाळी ६:३० वाजता योगी सभागृह, स्वामी नारायण मंदिर, दादर (पूर्व) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित राहतील. वीर सावरकरांचा मुळ पिंड दर्शवणारा महत्वाचा पैलू गीता उपासनी आपल्या व्याख्यानाने प्रस्तुत करणार आहे.