खडसेंबाबत भाजप आशावादी : चंद्रकांत पाटील

Eknath Khadse AND Chandrakant Patil.jpg

कोल्हापूर :- भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप अजूनही आशावादी आहे. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्व काही एक-दोन आठवड्यात सुरळीत होईल, असे कोल्हापुरात आज स्पष्ट केले. एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रवेशाचा त्यांचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे.

त्यानुसार सुरुवातीला त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाणार असून त्यानंतर विधानपरिषदेची आमदारकी दिली जाणार आहे. त्यानंतर सरकारमध्ये एखादं महत्त्वाचं खातं दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा सुरू आहे. एक-दोन आठवड्यात सर्व सुरळीत होणार आहे. मी स्वतः नाथाभाऊंशी बोलतो आहे. खडसे हे पक्षाला खूप मानतात. तुम्ही मीडियातून बोलू नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. त्यांनीदेखील ते मान्य केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER