महाराष्ट्रातील खिचडी सरकारमध्ये ‘आप’ची भूमिका ना डाळ, ना तांदूळ, ना मिठाची- भाजप

Amit Malviya-Preeti Sharma

मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या (Remedesivir injection) पुरवठ्यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता आम आदमी पक्षाने (आप) (AAP) उडी घेतली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करू शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रीती शर्मा (Preeti Sharma) यांनी केली आहे. शर्मा यांनी केलेल्या मागणीवर भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील खिचडी सरकारमध्ये ‘आप’ची भूमिका ना डाळ, ना तांदूळ, ना मिठाची आहे. आणि जर महाविकास आघाडी सरकार कमिशन घेतल्याशिवाय काम करत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुढे येण्याची गरज होती. आणि एक गोष्ट आप म्हणजे ‘आपण’ स्वतः होतो, मात्र आमच्यासाठी ‘आम्ही’ म्हणजे आपले राज्य, आपला देश होय, अशी खोचक टीका अमित मालवीय यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button