भाजपचे पुढचे पाऊल ; 5,6 जानेवारीला संघटनात्मक बैठका

नागपूर : भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. राज्याची आयती सत्ता गेल्यानंतर भाजपचे अनेक मोठे नेते त्या धक्क्यातून सावरताना मोठा कालावधी लागला मात्र, आता भाजप पुढचे पाऊल टाकत नवी रणनीती, नवे प्लान्स, संघटनात्मक मजबुती किंवा अनेक महत्त्वाच्या विषयांसंदर्भात एकजूट होत प्रदेश संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरू करत आहे.

प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या 5 व 6 जानेवारी 2021 रोजी विविध संघटनात्मक बैठका होणार आहेत. 5 जानेवारी रोजी पक्षाचे जिल्हा प्रभारी तसेच विविध मोर्चा आणि प्रकोष्ठ अध्यक्षांची बैठक ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. बुधवार 6 जानेवारी रोजी पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची दादर येथे बैठक होणार आहे. पक्षाचे केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER