मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी, भाजयुमो पदाधिकाऱ्याचा आरोप

CM Uddhav Thackeray - Devang Dave

मुंबई : एकीकडे कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी निधी नसल्याचा बनाव करायचा. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकार जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्च्याचे (Bharatiya Janata Yuva Morcha) संयोजक देवांग दवे यांनी केला आहे.

त्यांनी एक ट्विट करत हा आरोप केला. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री कार्यालयासाठी सोशल मीडिया हाताळण्यासाठी एजन्सी निवडण्याचे टेंडर काढले आहेत. कोविड -१९ च्या संकटकाळात कर्मचार्‍यांना वेतन देण्यास पुरेसा निधी नसताना एका मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी ५. ६३ कोटी रुपये खर्च केल्या गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रतिमा सोशल मीडियावर उंचावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाविनाशआघाडीकडे कर्मचार्‍यांचे वेतन आणि कोविड (COVID) रुग्णांना देण्यासाठी पुरेसा निधी नाही. मात्र बॉलीवूड पीआर अधिक महत्वाचे आहे! पीआर अँड सोशलमीडियावर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ६ कोटी रुपये का खर्च केले आहे याचा अंदाज लावा!, असा टोला दवे यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER