भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकले ; शिवसेनेचा पलटवार

Vinayak raut - narayan rane - Maharashtra Today

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणीकरिता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावरून त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांचंही नाव त्यात आहे . यावरून शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘भाजपने (BJP) पनवती म्हणून नारायण राणेंना (Narayan Rane) अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत.

भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून त्यांचा उल्लेख होतो.’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांनी राणेंवर निशाणा साधला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते .‘भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख आहे. भाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे एकसारखंच दिसत आहे. त्यांच्या रुग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जातात’ असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला. ‘भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे. स्वत:च्या घरात त्यांनी शांती घालावी.

वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत’ असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी राणेंना लगावला. ‘चिपी विमानतळाचा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे. मुळात चिपी विमानतळ नारायण राणेंच्या कारकिर्दीत प्रायव्हेट ऑपरेटरला दिलेले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास १५ दिवसांत विमानतळ सुरू होईल. ’ असंही राऊत म्हणाले. पदोन्नती आरक्षणावरून काही वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. पदोन्नतीचा प्रश्न वरिष्ठ नेते सोडवतील आणि त्यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. कुठलीही समस्या असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल. ’ असे विनायक राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button