भाजपची अचानक मुसंडी; शिवसेनेला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat election) निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीच्या पहिल्या सत्रात शिवसेनेने (Shivsena) जोरदार मुसंडी घेत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. भाजप (BJP) दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. मात्र दुपारनंतर भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केले.

प्रथम क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला मागे टाकत भाजपने पहिले स्थान गाठले आहे. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर मागे फेकली गेली. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने ११७८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना -११७२, राष्ट्रवादी – १०७४, काँग्रेस – ८९६ तर मनसेनेही आपले खाते उघडले असून, १५ ठिकाणी आणि स्थानिक आघाड्यांनी  १०७३ ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. शिवसेनेला पीछाडीवर टाकत दुसऱ्या क्रमांकावर जागा मिळवल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER