‘महाराष्ट्रात एकच ब्रॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज !’ ‘ठाकरे ब्रॅन्ड’वर नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane-Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅन्डचा (Thackeray Brand) जोर असायला हवा, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले . या वक्तव्यामुळे आता मनसे आणि भाजपने यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मुंबई असो की महाराष्ट्र एकच ब्रॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज….’ असे ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले .

दरम्यान कंगनाच्या प्रकरणावरून “ ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅन्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅन्ड ’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅन्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) हेसुद्धा त्याच ‘ब्रॅन्ड ’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात; पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅन्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅन्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल.” अशी चिंता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म’; शिवसेनेच्या सादेला मनसेची सणसणीत चपराक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER