पर्यावरण मंत्र्यांची ‘दिशा’ चुकली, वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे नाहीत – नितेश राणे

Nitesh Rane on Aditya Thackeray

मुंबई : बीडच्या पूजा चव्हाण (pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. परळीत राहणाऱ्या या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीने या प्रकरणात महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर सध्या या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांवर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं की, या महाविकास आघाडी सरकारच्या दूरदृष्टीला सलाम, पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. बाकी मंत्र्यांचे पण कहानी घर घर की चालू आहे, म्हणूनच जेल पर्यटन सुरू केले असावे. जनता मंत्र्यांना अजून कुठे भेटणार? असा चिमटा त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला (Shivsena) काढला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून नितेश राणेंनी ही टोलेबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER