राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा : निलेश राणे

मुंबई :-  पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Sucide case) प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधत ठाकरे सरकारला (Thackeray Govt) धारेवर धरले आहे.

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.

विरोधी पक्षाने एक दबाव निर्माण केला, त्यातून हा राजीनामा दिला गेला आहे. हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलंय. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचं काम थांबवायला हवं. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी, असं निलेश राणे म्हणाले.

भाजपच्या नेत्यांना या सगळ्या प्रकरणात धमक्या आल्या. परंतु मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्र यांचा बापाचा नाहीय एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रामधून जाणार आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER