भाजप पक्ष चालविण्यासाठी उद्योजक किंवा कंत्राटदारांकडून पैसा घेत नाही : अमित शहा

BJP never take mony from industrialists or contractor for run the party : Amit Shah

नवी दिल्ली : राजकारण चालविण्यासाठी भाजप उद्योजक किंवा कंत्राटदारांकडून पैसा घेत नसून पक्ष स्वत:चा पैसा वापरत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. ते म्हणाले, मला अभिमान आहे की, भाजप कार्यकर्ते म्हणतात, आम्ही आमचा पक्ष स्वत:च्या पैशाने चालवितो. भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आज भारतीय जनता पार्टी साजरी करीत आहे. दीनदयाळ उपाध्याय पार्क येथे आयोजित एका कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, दीनदयाळजींची संकल्पना होती की, पक्ष हा कार्यकर्त्यांच्या आणि संघटनेच्या भरवशावर उभा राहावा .

दीनदयाळजी आम्हा सर्वांचे प्रेरणा स्रोत आहेत . त्यांनी स्वत:ला प्रकाशझोतापासून दूर ठेवून पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारक आणि राजकीय पक्ष भारतीय जनसंघाचे माजी नेते होते. ते १९६७ साली जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र ते पराभूत झाले. त्यांचा मृत्यू ११ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला.