‘राज्यात लवकरच भाजप-राष्ट्रवादीचे सरकार’; महाविकास आघाडीतील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

sharad Pawar - Devendra Fadnavis - Maharastra Today

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष केवळ विरोधक असल्याचे जनतेला भासवत आहेत. ही केवळ नुरा कुस्ती आहे. लवकरच पहाटेच्या शपथविधीसाठी पुन्हा ते दोन्ही पक्ष एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार आल्यास चिंता करण्याचे कारण नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल येथे जाहीर सभेत केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या शेवटच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. लोकांच्या खिशाला कात्री लावून वसुली करण्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. लाॅकडाऊन काळातील थकीत वीजबिल माफ करण्यात येईल, असे आश्वासनं सरकारने दिले होते, पण सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. अशा लबाड सरकारला जागा दाखवून देण्याची ही संधी चालून आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळत नाही. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. बारा बलुतेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य अडचणीत असतानाही मंत्र्यांच्या घरावर सरकार कोट्यवधी रूपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे सरकारकडे नैतिकताचा शिल्लक राहिली नाही.

दोन्ही उमेदवारांच्या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ८६ कोटींची एफआरपीची थकली आहे. यावर कोणीच बोलत नाही. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून एकमेकावर चिखलफेक करण्याचा प्रकार सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे केवळ दाखवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात आहे. त्यांची ही केवळ नुरा कुस्ती आहे. आम्ही त्यांचा हा डाव ओळखूनच स्वाभिमानी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदार संघात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखे गल्लीबोळात फिरत आहेत. त्यांना या उमेदवाराचे काहीच देणंघेणं नाही. त्यांचा डोळा फक्त विठ्ठल साखर कारखान्यावर आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला. ही लढाई परिवर्तनाची आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही संधी चालून आली आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असल्याने मतदारांनी जागरुकतेने मतदान करावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलं. या वेळी सचिन पाटील, श्रीमंत कोकाटे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश प्रवक्ते रणजीत बागल, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, उमेदवार सचिन पाटील, शहाजान शेख, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक धनंजय पाटील, राजाराम सावंत, विश्रांती भुसनर, विजय रणदिवे, अॅड.राहुल घुले आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button