बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती : नारायण राणे

Narayane Rane & Uddhav Thakeray

मुंबई :- ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही, असा गंभीर आरोप भाजपा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले आहे.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असे विधानही राणे यांनी केले आहे. या सरकारला काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेले तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू, असे नारायण राणे यांनी म्हंटले .

नारायण राणे यांनी यावेळी फटाके फोडण्यावर राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही टीका केली. दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुले , मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे,असे ते म्हणाले .

शिवसेना (Shivsena) शब्द पाळते असं मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. बिहारमध्ये शिवसेनेची काय दैना झाली..एकाचं तरी डिपॉझिट वाचवू शकले का? भाजपासोबत शिवसेनेने कोणतीही बरोबरी करु नये. महाराष्ट्र सोडून कुठेही त्यांची चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात दे ५६ आले त्यासाठी भाजपाच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उमेदवार उभे केले, ५० जणांचं डिपॉझिट जप्त झाले याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने टीका करणं आता बंद करावे , असा सल्ला राणे यांनी दिला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER