भाजप : बंगालमध्ये मुसंडी, पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन, आसाममध्ये सत्ता राखली, तामिळनाडू आणि केरळात फाईट

BJP - Maharashtra Today

कोलकाता : भाजपसाठी आजचा दिवस आनंदाचा नसला तरी नैराश्याचाही नाही. कारण बंगालमध्ये भाजपाची सत्ता नसली तरी त्यांनी मोठी मुसंडी मारली आहे. एकंदरीत आसाममध्ये सत्ता मिळवण्यास यश आणले, पुद्दुचेरीत सत्ता मिळवली आहे, तामिळनाडूत जोरदार टक्कर आहे, तर केरळात अस्तित्व निर्माण केले आहे.

१. पश्चिम बंगालमध्ये मुसंडी
पश्चिम बंगालमधील २९२ जागांपैकी २८४ जागा पकडल्या आहेत. यात टीएमसीने २०२ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने ७७ जागांसह आघाडी घेतली. त्यामुळे बंगालमधील सत्ता बदलण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, असे असले तरी २०१६च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत भाजपने ७७ जागांवर उडी घेतली. भाजपच्या या यशामुळे ममता बॅनर्जींसमोरही आव्हान उभे आहे.

२. केरळमध्ये फायदा
केरळमध्ये भाजपला फारसे यश आले नाही. गेल्या वेळी केरळात भाजपचा एक आमदार होता. यावेळी भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. भाजपने मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र, आता या निवडणुकीत श्रीधरन आघाडीवर आहेत. ते भाजपला दोन अंकी संख्येपर्यंतही पोहचू शकले नाहीत. दरम्यान, केरळमध्ये सत्तेतील पक्षाला येथील मतदार दुसऱ्यांदा संधी देत नाही. मात्र, पहिल्यांदाच सत्तेतील डाव्या पक्षांना केरळच्या जनतेने कौल दिल्याचे दिसून आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोनाकाळात चांगले काम केले. त्यामुळे त्यांना केरळच्या जनतेने पुन्हा संधी दिल्याचे बोलले जात आहे.

३. तामिळनाडूत तीन जागांवर आघाडी
तामिळनाडूत भाजपने एआयएडीएमकेसोबत युती केली होती. सत्ताधारी पक्षासोबत युती करून १०-१५ जागा जिंकून सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, मतदारांनी एआयएडीएमके आघाडीला साफ नाकारले. तामिळनाडूत डीएमकेला १४० आणि एआयएडीएमकेला अवघ्या ८९ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला तीन जागांवर आघाडी मिळालेली दिसत आहे.

४. आसाम राखले
भाजपला आसाममध्ये सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे आसाममध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे आसाममध्ये काँग्रेस सत्ता परिवर्तन करू शकेल असे वाटत होते. तर भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामची सूत्रे हाती घेतली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींना टार्गेट केले. आसाममध्ये भाजप आघाडी ७७ तर काँग्रेस आघाडी ४९ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने सुरुवातीपासूनच काँग्रेसवर २० जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये भाजप सत्तेत राहील असे संकेत आहेत.

५. पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन
पुद्दुचेरीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र, आता भाजपला पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन करण्यास यश आले आहे. भाजप आघाडीला १७ आणि काँग्रेसला ११ जागा मिळताना दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसला चार जागांचे नुकसान होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. मात्र, एकंदरीत या पाचही राज्यांचे निकाल पाहता भाजपची परिस्थिती अगदी वाईट आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button