शरद पवारांच्या बैठकीत उदयनराजे अनुपस्थिती ; राजकीय चर्चांना उधाण

Udyanraje-Sharad pawar

सातारा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी दौरा करत आहे. आज शरद पवार हे साताऱ्यातील कराडमध्ये पोहोचले. यावेळी पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये (Karad) होत असलेल्या कोरोना आढावा बैठकीला साताऱ्यातील दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले गैरहजर आहेत. पवारांच्या उपस्थितीतील बैठकीला उदयनराजेंनी (Udyanraje) अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना रंगल्या आहेत. इतकेच नाही तर या बैठकीला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithaviraj Chavan) हे गैरहजर होते.

साताऱ्यात (Satara) कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे . यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या उपस्थितीत कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. पण, या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण गैरहजर होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाही, असं सांगण्यात आले आहे. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळेच चव्हाण या बैठकीला हजर नाही, अशी चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सुद्धा या बैठकीला गैरहजर आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हापासून उदयनराजे भोसले हे पवारांपासून दूर अंतर ठेवून आले.

दरम्यान या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह भाजप आमदार शिवेंद्रराजे, गृहराज्यमंत्री आणि पाटणचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई, कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिकही हजर आहेत.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER