आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शिवसेना नेते शंभूराज देसाईंच्या घरी

मुंबई : साताऱ्यात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे .एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

शंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल, असे उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER