मी भाजपबाहेर जावं, असे कोणी म्हणत असेल, तर…; राष्ट्रवादीशी जवळीकीवर संजयकाकांचे स्पष्टीकरण

Sanjaykaka Patil

सांगली : राष्ट्रवादीशी जवळीक नाही, पण गट-तट, पक्ष हा मुद्दा बाजूला ठेवून चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो, असे वक्तव्य (Sanjaykaka Patil) भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केले. मी भाजपातून बाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असंही संजयकाका म्हणाले. व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या संजयकाका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी बोलावून आग्रहाने जवळ बसवल्याने चर्चेला पुन्हा तोंड फुटले .

सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली दौर्‍यात संजयकाका आवर्जून उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, गट तट पक्ष हा मुद्दा थोडा बाजूला ठेवून जिल्ह्यातील चांगल्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असं म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असेही संजयकाका म्हणाले. वारंवार जयंत पाटील आणि संजयकाका पाटील हे एकत्र येत असल्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER