भाजपचे नाराज खासदार जयंत पाटलांच्या कार्यक्रमात, दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा

सांगली : पक्षाशी नाराज असलेले भाजप (BJP) खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) हे पक्षातील नेत्याच्या दौऱ्यात दिसत नसले तरी सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढंच नाही तर जयंत पाटील (Jayant Pati) त्यांना जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा रंगली. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले याचीसुद्धा अनेक उदाहरण आहेत. मात्र जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्यावेळी खासदार संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात. आज सुद्धा सांगलीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. स्टेजवर आवर्जून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना आपल्या जवळ बोलवून बसवलं. आणि या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. यापूर्वी सुद्धा एका बंद खोलीतून दोन नेते एकत्र बाहेर निघाल्याचे दिसून आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER