भाजपचे खासदार संजय पाटील यांना कोरोनाची लागण

Sanjay Patil

सांगली : सांगलीचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. खा. पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी तपासणी करून घेतली व ती पॉझिटिव्ह आली. आपली ‘तब्येत बरी आहे. मी योग्य उपचार व काळजी घेत आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. मी लवकरच पुन्हा लोकसेवेत रुजू होत आहे.’ असे मनोगत त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात बहुतांश लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER