ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत प्रीतम मुंडेंचा शिवसेनेला टोला

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar )यांचा शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश निश्चित झाला आहे. खुद्ध शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच यासंदर्भात खुलासा केला . तर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत शिवसेनेला टोला लगावला आहे.जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या .

ऊर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ऐकलं आहे. मातोंडकर यांना माझ्या शुभेच्छा आहे. त्यांनी अगोदर काँग्रेसकडून नशीब आजमावलं त्यात त्यांना अपयश आलं होतं. आता बघू त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते’,अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी टीकास्त्र सोडले .

प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर हे केंद्राच्या पीएम निधीमधून आले आहे, यात राज्याच्या कोणताही वाटा नाही. कोविड सेंटर उभारण्यात राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई झाली आहे, अशी टीकाही प्रीतम मुंडे यांनी केली.

शेतकरी कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करून केंद्र सरकरबाबत रोष निर्माण केला जात आहे. पत्रकार, कलाकार आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून म्हणून केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे स्वतः अस्ताकडे चालले आहे.

कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण करणारे हे सरकार आहे. या सरकारने आमच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे बिघाडी आणि स्थगिती सरकार आहे. असेही त्या म्हणाल्या .

राज्य सरकारने फक्त बदल्या आणि नवीन गाड्या घेण्याचा काम केले आहे. आमच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून मदत दिली. मात्र, आताचे राज्य सरकार सर्व बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहे. आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत मागणाऱ्यांना आज स्वतःची सरकार असताना शेतकरींचा विसर पडला आहे,असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER