कार्यकर्त्यांच्या कुटुंबांनी भाजपचं नि:स्वार्थपणे काम केलं : प्रीतम मुंडे

munde-pritam

बीड : भाजप नेत्या आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना भाजपच्या राजकीय प्रवासाविषयी माहिती दिली. टाकाऊपासून टिकाऊपर्यंतचा भाजपचा राज्यात प्रवास उल्लेखनीय आहे. या प्रवासात सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळेच भाजप हा पक्ष महाराष्ट्रात टिकाऊ झाला आहे, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांनी आज माजलगावात शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या सक्षम गूळ उद्योगाचे उद्घाटन केले. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, तुम्ही तुमच्या बोलण्यातून जसं सांगितलं, तुमच्या पूर्वीच्या अनुभवातून तुम्ही ज्या गोष्टी पडलेल्या आहेत त्यांना उभं करण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे तुम्ही शिकलेले आहात. गुळाचा तो उपयोग आहेच; पण भाजपला जेव्हा कुणी विचारत नव्हतं तेव्हा भाजप पक्षाचं काम आपल्या कुटुंबानं केलं. त्यावेळी कदाचित समाजात ज्या पक्षाकडे टाकाऊ दृष्टिकोनाने बघत होते. तो पक्ष टिकाऊ झाला आहे. आज सगळ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष फुललेला दिसत आहे. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. जसं पक्षाचं भविष्य उज्ज्वल आहे तसंच तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल आहे, असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER