ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणेंचे टीकास्त्र

मुंबई : भाजपाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर आपली भूमिका मांडली. राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. तो राज्याचा नसून फक्त पुणे केंद्रीत अर्थसंकल्प आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या (Uddhav Govt) टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिराती ही निव्वळ धूळफेक आहे. या जाहिराती बघून लोक ठाकरे सरकारला शिव्या घालत आहेत. कोकणातील चक्रीवादळाच्या समस्येवर एक रूपयाही आला नाही, असं नारायण राणे यांनी सांगितले .

ठाकरे आणि पवार यांच्या आश्वासनांना काही किंमत नाही. सरकारने आता केवळ आश्वासन न देता, प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. MPSC परीक्षांच्या बाबतीत सरकारने पूर्णपणे गोंधळ घालून ठेवला आहे. केंद्र आणि मुंबई महापालिकेच्या अनेक योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात केलाय. हे करता येतं का? याचे पैसे तुम्ही देणार आहेत का?” असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER