काय भाजप खासदार नाना पटोले काँग्रेसमध्ये जाऊ शकतात?

नागपूर : गोंदिया-भंडारा लोकसभेचे भाजप खासदार नाना पटोले पक्ष सोडण्याच्या तयारीत असून येणा-या दिवसांत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चिन्हे दिसत आहे.

त्यांनी स्वत:चा प्रादेशिक पक्ष काढला किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको. कारण एडवेंचर करणे त्यांच्या स्वभावात आहे. ते काँग्रेस आणि शिवसेनेत होते. त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली. ज्यापद्धीने ते भाजपशासीसत सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत आहेत. त्यावरून तरी काही बाबी स्पष्ट होताना दिसत आहे.
या खासदाराने सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करताना म्हटले होते कि, ते आपल्या सहकार्यांचे कदाचितच ऐकतात. ब-याचदा मोदींना प्रश्न विचारणे आवडत नाही.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पटोले यांनी म्हटले होते कि मुख्यमंत्री पक्षाच्या खासदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करीत नाही. याशिवाय त्यांनी स्वत:च्या पक्षालाच टिकेचे लक्ष्य केले होते. शेतक-यांच्या परिस्थितीत कुठलाही बदल झाला नसून महाराष्ट्रात पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत जास्त शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता.

पटले म्हणाले, जर ओडिशासारखे राज्य शेतक-यांना धानासाठी किमान समर्थन दर देत असेल तर महाराष्ट्र का देत नाही? एक काळ होता कि महाराष्ट्र याप्रकारचे निर्णय घेत होते आणि इतर राज्य त्याचे अनुकरण करत होते. त्यांनी म्हटले होते कि जर राज्यात राबविल्या जाणा-या धोरणामुळे जनतेच्या फायदा होत नसेल तर माझे मित्र असलेल्या मुख्यमंत्र्याविरुद्ध बोलण्याचा मला अधिकार आहे. देवेंद्र आणि मी एकाचेळी आपले राजकीय करीअर सुरु केले होते. मी त्यांना मित्र मानतो. जर त्यांचे काही चुकत असेल तर त्यांनी ते जनतेच्या हितासाठी दुरुस्त करून घेतले पाहिजे, असेही पटले म्हणाले.

खासदार पटोले यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्धही आक्रामक पवित्रा घेतला. पाटील यांनी कर्जमाफीसाठी आलेल्या शेतक-यांच्या ऑनलाईन अर्जात 10 लाख अर्ज बोगस असल्याचे म्हटले होते.

राजकियदृष्ट्या महत्वाकांक्षी असलेल्या पटोले यांनी नागपूर महानगर पालिकेविरुद्धही टीका केली होती. नागपूरच्या सिंमेंट रस्त्याच्या बांधकामात वापरले जाणा-या सिमेंटची गुणवत्त कमी दर्जाची असल्याचे म्हटले होते.
पटोले यांचे जवळचे लोकही कबुली देतात की भाजपा खासदार भाजपासून समाधानी नाहीत. मोदी-फडणवीस यांच्या कारकिर्दीत त्यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. शिवाय त्यांचे राजकिय विरोधक आणि माजी मंत्री प्रफुल पटेल यांना यांचेशी भाजपशी असलेली जवळीक लक्षात घेता पटोले समाधानी नाहीत. पटोले यांनी प्रफुल पटेल यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारी मतांनी पराभव केला होता.

2019 साली होणा-या लोकसभा निवडणुकीत प्रफुल पटेल गोंदिया-भंडारा मतदार संघातून एनडीए चे उम्मीदवार म्हणून लढू इच्छित आहे (जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपत निवडणुक समझौता झाला तर), पटोले दावा मानन्यात येत नाही . मात्र नुकतेच याप्रकारचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पटेल यांनीही दिले आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर पटोलेसुद्धा विकल्पाच्या शोधात असल्याचे पटोले यांच्या निकटवर्ती सुत्रांनी सांगितले.

भाजपच्या जवळच्या सुत्रांनीसुद्धा दावा केला आहे कि, पक्षशिस्त मोडल्याच्या नावाखाली खासदार पटोले यांच्याविरुद्ध 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही महिने आधी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.