कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-मनसे एकत्र येतील !

raj thackeray-devendra fadnavis

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाकित भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं आहे.

गणपत गायकवाड म्हणाले, एकमेकांना शिव्या देणारे एकत्र येऊ शकतात, तर आम्ही हिंदुत्ववादी आणि देशाच्या हिताचा विचार घेऊन चालणारेही एकत्र येऊ शकतो. मनसे भाजपाच्या युतीचे सुर जूळू शकतात असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला सोबतच महाविकास आघाटीवर निशाणाही साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमि मनसे अध्याक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सतत मनसे भाजपा युतीचे सूर आळवले जात आहेत. त्यातच भाजपा आमदार गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे मनसे भाजपा युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होऊ शकते असे गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटले आहे.

ते, कल्याणमधील पिसवली गावच्या रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. पिसवली गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावात सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी डीपी प्लॅन मांडण्यात आला अस गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

CAA विरोधातील मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेची महत्वपूर्ण बैठक