…तर शक्ती कायद्याच्या समितीतून भाजपचे आमदार राजीनामे देतील; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर विरोधकांचा दबाव वाढला आहे. त्यातच उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात होणार असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) जोरदार हल्लबोल केला. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.

महिला अत्याचारांमध्ये मंत्रिमंडळातले मंत्रीच आघाडीवर आहेत. पुरावे असूनही कारवाई होत नसेल, मंत्री कायम राहात असतील, तर शक्तीसारख्या कायद्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करून जर राठोडांचा राजीनामा घेतला गेला नाही तर, शक्ती कायद्याच्या समितीतून भाजपचे आमदार राजीनामे देतील, असा गर्भित इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला. यावेळी फडणवीस म्हणाले की, संजय राठोड यांच्या प्रकरणात सर्व फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. सबळ पुरावे असतानाही अजूनपर्यंत एफआरआय दाखल झाला नाही.

ही पोलिसांची लाचारी आहे. महाराष्ट्र पोलिसांचे नाव आहे. मात्र आतापर्यंत मी कधीही पोलीस विभागाला एवढ्या लाचारीच्या स्थितीत बघितलेले नाही. ढळढळीत पुरावे असताना संजय राठोड यांना अटक होत नाही. पूजा चव्हाण हिच्या फोनवर ४५ कॉल आले, हेसुद्धा क्लिअर आहे. संजय राठोड राजीनामा देत नाहीत, मंत्री राजीमाना देत नाहीत यावरून मंत्र्याला अभय असल्याचं उघड झालं आहे. औरंगबादमध्येही एका कार्यकर्त्यावर आरोप झाले. यामध्ये एफआरआय दाखल होऊनही कारवाई झाली नाही, हे पहिल्यांदाच दिसून आलं, असेही फडणवीस यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER