कुंभमेळ्यावर ट्विट करणारे सेक्युलर जितेंद्र आव्हाड कुठाहेत? भाजप आमदारांचा सवाल

Atul Bhatkhalkar Question to Jitendra Awhad

मुंबई :- देशभरात कोरोनाने (Corona Virus) थैमान घातले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन असताना, काल मुंब्र्यामध्ये ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आवश्यक आहे. पण मुंब्र्याच्या बाजारपेठेत या नियमांचे कोणतेही पालन झाले नाही. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) शाब्दिक टीका केली आहे.

“मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते. कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत?” असा सवाल भातखळकरांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

“मुंब्र्यामध्येच लसीकरणाला विरोध झाला. पहिल्या लाटेच्या वेळी आयसोलेशन सेंटरमध्ये जायला विरोध झाला. याच मुब्र्यात रमजानच्या नावाखाली लोक हिंडत आहेत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार असलेल्या बेस्ट सीएमच्या राज्यात वेगवेगळ्या धर्मीयांना वेगवेगळे न्याय आहेत. कुंभमेळ्यावर ट्विट  करणारे सेक्युलर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कुठे आहेत? मंत्री आणि आमदार म्हणून त्यांनी उत्तरे द्यावीत. हे मतांच्या लालसेपायी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.” अशी टीका भातखळकर यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button