शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला हलवलं

Shivendra Raje Bhosale

मुंबई : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती खालवली आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रक्तदाबाचा त्रास झाल्याने शिवेंद्रराजे अस्वस्थ झाले. पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

आमदार शिवेंद्रराजे यांना सुरूवातीला साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना चांगलं वाटल्यास घरी सोडणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याची माहिती आहे .

आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बुधवारी त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. यावेळी त्यांना रात्री उशिरा अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. शिवेंद्रराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वेदांतिका राजेदेखील रुग्णलायात असल्याची माहिती आहे. शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.