राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांचे प्रत्युत्तर

Jitendra Awhas - Nawab Malik - Ram Kadam Video

मुंबई : कोरोनामुळे पसरलेला अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करून दारात किंवा बालकनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईल फ्लॅश लाईट लावावेत, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) देशातील जनतेला संबोधित केले. मोदी यांनी केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पश्चिम रेल्वे करणार 410 रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर; COVID 19 च्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था

 ‘देश एका अवघड संकटाचा सामना करत असताना समस्त १३० कोटी देशवासी एकत्रितपणे या संकटाशी संघर्ष करत आहेत. या अंधकारमय परिस्थितीत तिमिराकडून प्रकाशाकडे जात असताना हातात आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही १३० कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश!’ असे राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटला कोट करून लिहिले आहे.

तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या कोट्यवधी लोकांसाठी दिलेले मोफत धान्य कुठे गेले ? दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत एक किलोही मोफत धान्य कोणत्याही गरिबापर्यंत पोहचवले नाही. ’ असा थेट सवाल राम कदम यांनी नवाब मलिक यांच्या ट्विटला कोट करून विचारला आहे. दरम्यान कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचे आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे.

रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मला तुमची नऊ मिनिटं द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बालकनीत उभे राहून नऊ मिनिटं मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असे पंतप्रधान म्हणाले होते. यावरून ‘आम्हाला वाटले, मोदी काही तरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या याची माहिती देतील.  किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील.

पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत. मोदी यांचा हा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा आहे. लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती. ’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले होते.