नाथाभाऊ, आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरे काहीच केले नाही; भाजप नेत्याची टीका

Eknath Khadse-Ram Satpute

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. टीकेला भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्रभाऊबद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार.

निष्कलंक देवेंद्रजींवर बोलण्या अगोदर आरसा बघा, सगळं लक्षात येईल, असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राह्मण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरी ठरत नाही. सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री-बेरात्री पण स्वप्न पडत असेल, अशी टीका एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी केली होती.

ही बातमी पण वाचा : अमित शहांचे मोठे विधान: महाराष्ट्रातील ‘ठाकरे’ सरकार स्वतः कोसळणार, राष्ट्रवादीसोबत युतीचेही संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button