शिवसेनेनं सुशांतच्या कुटुंबाला बदनाम करण्याची सुपारी घेतली – राम कदम

Ram Kadam has criticized Sanjay Raut.jpg

मुंबई : देवाघरी गेलेल्या सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) बद्दल मेल्यानंतर सुद्धा शिवसेना (Shivsena) नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात. मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हा हिंदू धर्मातला संस्कार  शिवसेना नेते ‘सामना’कार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली आहे.

सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल. मुंबई पोलिसांनी तपासात जी नैतिकता व गुप्तता दाखवली ती एखाद्याचे मृत्यूनंतर धिंडवडे निघू नयेत यासाठीच, पण सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच पहिल्या 24 तासांतच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिहार राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातून म्हटले आहे. त्यावर कदम यांनी राऊतांवर टीका केली.

‘सामनाकार स्वार्थापोटी विसरले हे दुर्दैव ! सीबीआय तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षत्कार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेते सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या बाबतीत चोकशी पूर्ण होण्या आधीच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्याना कुणाला वाचवायचं आहें? हा प्रश्न अधिक पडतो,” असे ट्वीट कदम यांनी केले आहे. ‘सामना’कार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि सुशांतच्या कुटुंबाला बदनाम करण्याची आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचे दिसते आहे. सुशांतच्या ७४ वर्षांच्या म्हाताऱ्या वडिलांना आणि कुटुंबियांना शिवसेनेने वारंवार अपमानित केले आहे, असेही राम कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER