अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत ; भाजप नेत्याचा सल्ला

Prasad Lad - Sharad Pawar - Anil Deshmukh

मुंबई : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे घेणे राजकीय नेत्यांना शोभणारे नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून क्लासेस घ्यावेत, असा टोला भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी लगावला.

राज्यात कोव्हिडची (COVID-19) परिस्थिती असताना, मराठा आंदोलनाचा विषय असताना अशी वक्तव्ये करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आम्ही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करतो, असे प्रसाद लाड म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न चार ते पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. यात एका अति वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असे अनिल देशमुखांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER