भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; बॅनरवर खडसेंचा फोटो

Eknath Khadse - Sanjay Savkare

जळगाव : एक महिन्यापूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर खडसे काय चीज आहे हे भाजपला लवकरच कळेल, असा थेट इशारा दिला होता. त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आता खडसेंचे खंदे समर्थक आणि भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

आज सावकारे यांचा जन्मदिवस असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जळगाव आणि भुसावळमध्ये बॅनर लावले. मात्र या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह न टाकता त्यांनी एकनाथ खडसेंचे फोटो टाकले आहे. त्यामुळे सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर सावकारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER