वकील साहब की लग गयी, आता ‘एलिजीबल बॅचलर’तर्फे मानहानीची नोटीस कोण पाठवणार? : नितेश राणेंचा सवाल

Aaditya Thackeray - Nitesh Rane

मुंबई :निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे .

शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का, वकील साहेबांची तर लागली आहे , अशा आशयाचे ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला.

मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

दरम्यान नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button