अजित पवार-अशोक चव्हाण चौकशीला सामोरे गेले; शेंबड्या मुलासारख्या शपथा खाऊ नका : नितेश राणे

bjp-mla-nitesh-rane-slams-minister-anil-parab

मुंबई : “वकील आहात, लहान शेंबड्या मुलासारख्या शपथा खाऊ नयेत.” अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांना खडेबोल सुनावले आहे . जो नियम अनिल देशमुख, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना लागू झाला होता, तोच आता अनिल परब यांना लागतो, असेही नितेश राणे म्हणाले. जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, जो नियम सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजित पवारांना लागला, जो नियम आदर्श घोटाळ्याच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो, तोच अनिल परब यांना लागतो.

तेव्हा त्यांनी शपथा खाल्ल्या नव्हत्या. ते चौकशीला सामोरे गेले. लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका” असं नितेश राणे म्हणाले. “सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यामधले संवाद हे एनआयएकडे आहेत. टेलिग्रामचे चॅट पण त्यांच्याकडे आहेत. उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरं जा.” अशा शब्दांत नितेश राणेंनी निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विचारलं होतं की, गृह खातं अनिल देशमुख चालवतात की अनिल परब, यावर काल शिक्कामोर्तब झालं आहे. वकील असलेल्या माणसाने अशा प्रकारच्या शपथा खायच्या असतात का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला हवं, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button