मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, म्हणजेच दाल में कुछ काला है!; नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane & Uddhav Thackeray & Aaditya Thackeray

मुंबई : सुशांतसिंह राजपूत असो की दिशा सालियनप्रकरण असो, त्याबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात भाष्य केले. याप्रकरणी ठाकरे यांनी स्पष्टीकरण देऊन त्यांचे चिरंजीव, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा बचाव केला. याचाच अर्थ दाल में कुछ काला है, असा दावा करतानाच या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास झालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते .

खरे तर सुशांतसिंह राजपूतप्रकरण असो की दिशा सालियनप्रकरण असो. आम्ही कुणीही आदित्य ठाकरेंचं नावा घेतलं नव्हतं. त्यावर आदित्य ठाकरेंनी स्वत: पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं. आता त्यांच्या वडिलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. याचाच अर्थ दाल में कुछ काला है हे स्पष्ट होते , असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही पुत्रांवर निलेश राणेंची जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER