पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर, मग बाकीचे बघू… नितेश राणेंचे शिवसेना आमदाराला प्रत्युत्तर

Sanjay Gaikwad-Nitesh Rane

मुंबई :- बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. संजय गायकवाड यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल… पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल.” अशा शब्दात टीका केली आहे.

दरम्यान “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते.” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. फडणवीसांनी कोरोनावरून राजकारण करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button