आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, मग… ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंना टोला

CM Uddhav Thackeray - Nitesh Rane

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावरुन राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहे . यावरुन भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला असून आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा अशी टीका केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी २०१५ मधील ‘द क्विंट’च्या एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. “धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली.यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, असे राणे यांनी म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER