आणखी किती थुंकणार आमच्यावर? त्यापेक्षा राज्य सरकारने जाहीर विष वाटप करावे : नितेश राणे

Nitesh Rane-uddhav

मुंबई : मराठा आरक्षणा(Maratha Reservation) प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं (SC) महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे .

नितेश राणे(Nitesh rane) ट्विट करत म्हणाले की, दोन दिवसांअगोदर मराठा आरक्षण रद्द, त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्र सरकारने(Maharashtra Govt) १६,००० पदांसाठी मेघा भरती जाहीर केली. अजुन किती थुंकणार आमच्यावर?, असा सवाल उपस्थित करत सरकारने जाहीर विष वाटप करावे, या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाच आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button